Publisher's Synopsis
तू माझा सांगाती ईश्वर विविध माध्यमांद्वारे आपल्याला सतत मार्गदर्शन देत असतो. पण चुकीच्या धारणांमुळे, अज्ञानामुळे आपण ते समजू शकत नाही. परिणामी अमूल्य संदेशापासून वंचित राहून आपण आयुष्यभर दुःखच झेलत बसतो... ईश्वराची साथ सदैव आपल्या सोबत असते. इतकंच नव्हे, तर तो सतत आपल्या अंतरंगात विराजमान असतो. सुखात आणि दुःखातही त्याची उपस्थिती कायमच असते. मग तरीही आपण या दिव्य मार्गदर्शनापासून वंचित का राहतो? कारण ईश्वराचं मार्गदर्शन कसं प्राप्त करावं, याबाबतीत आपण अनभिज्ञ असतो. प्रस्तुत पुस्तक म्हणजे ईश्वरीय संदेश ग्रहण कसा करावा, यासंबंधी दिशा दाखवणारा दीपस्तंभच! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समृद्ध, ज्ञानसंपन्न आणि उन्नत बनण्यासाठी, तसेच जीवनाचा अर्थ जाणण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल. मग तुम्हीही ईश्वराला म्हणाल, 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.'