Publisher's Synopsis
हिंदू धर्माचा श्रद्धांचा आणि रीतीरिवाजांचा असा एक चिरंतन मार्ग आहे. तो यात्रेकरूंच्या पाऊलखुणांच्या आणि अध्यात्माच्या ज्ञानी लोकांच्या शिकवणुकींच्या आणि त्याबरोबरच मिथक, विज्ञान आणि राजकारण यांच्या माध्यमातून हजारो वर्षांपासून तयार झाला आहे; परंतु आजच्या आधुनिक हिंदूकरिता या सगळ्याचा काय अर्थ आहे? जे लोक या धर्माचे अनुसरण करण्याचा उपदेश करतात, त्यांना हा धर्म कसा वागवतो? धर्मांविषयीच्या तावातावाने सुरू असलेल्या चर्चांपासून दूर असलेल्या एका सर्वसामान्य हिंदूचा हा प्रवास आहे. या पुस्तकात हिंदू होण्याचा अर्थ शोधण्यासाठी हिंदुत्वाचा अभूतपूर्व शोध घेण्यात आला आहे. हा जवळजवळ तुमच्या नजरेने घेण्यात आलेला शोध आहे.