Abhinayankit

Abhinayankit

Paperback (21 Jul 2023) | Marathi

  • $17.85
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

आपण अनेक वेळा एखादी कलाकृती पाहतो आणि त्यातलं अभिनेत्याचं काम चांगलं का वाईट असा शिका मारून मोकळे होतो, परंतु अभिनेत्याने एखाद्या पात्रासाठी काय आणि कशी मेहनत घेतली असेल याचा आपल्याला अंदाज असतोच असं नाही. पण काहीअभिनेते आणि अभिनेत्री मात्र आपल्या सहज अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत आले आहेत. या कसदार कलाकारांनी आपलं एक स्थान निश्चित केलं आहे. लेखिका आणि ज्येष्ठ सिने-नाट्य अभ्यासक जयश्री दानवे यांनी या पुस्तकात अशाच १६ अभिनेत्यांचा एक माणूस आणि एक कलाकार म्हणून झालेला प्रवास उलगडून दाखवला आहे. यातील काही कलावंताना नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. निळू फुले, डॉ. श्रीराम लागू ते भरत जाधव, सुबोध भावे आणि सचिन खेडेकर अशा अजून काही निवडक ज्येष्ठ आणि गुणी अभिनेत्यांचा प्रवास या पुस्तकात लेखिकेने उलगडून दाखविला आहे. जयश्री जयशंकर दानवे या ज्येष्ठ सिने नाट्य अभ्यासक आहेत. ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर येथे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ संगीत शिक्षिका म्हणून काम केलं आहे. आजवर त्यांची जवळपास ३१ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना त्यांच्या कार्यासाठी आणि लेखनासाठी असंख्य पुरस्कार लाभले आहेत. आघाडीच्या वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमध्ये त्यांचे लेखन वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे. लेखनाबरोबरच त्या पार्श्वगायनही करतात. साहित्य अभिवाचनाचे कार्यक्रमही त्या करतात.

Book information

ISBN: 9789395139205
Publisher: Repro India Limited
Imprint: Sakal Media Pvt Ltd
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 158
Weight: 191g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 9mm