Publisher's Synopsis
'राजपुत्र आणि डार्लिंग' हा संग्रह १९७७ साली प्रथम प्रकाशित झाला. वृत्तरचना आणि गेयता (लिरिक्स) यांना जानेवपूर्वक टाळून ज्यामुळे अनुभवाची पातळी एकसंध राहू शकते अशा मुक्त रचनेचा वापर ग्रेस यांनी इथे केला आहे. वस्तू, घटना, चिन्हे, प्रतिमा, प्रतीके, आणि संकेत यांबरोबरच एमिली ब्रॉंतेची आणि एमिली डिकन्सनची अवतरणे हे या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य.