Publisher's Synopsis
तुघलक गिरीश कार्नाड - अनु. विजय तेंडुलकर भारतातील एक महत्त्वाचे नाटककार असलेले गिरीश कार्नाड यांच्या नाटकाच्या कहाण्या -कथानके ही वेदातील, पुराणातील किंवा ऐतिहासिक लोककथेतील आहेत. यापूर्वी ती इतर ठिकाणी येऊन गेलेली, विस्मृतीत गेलेली असतात. तुघलक इतिहासात येऊन जातो पण लक्षात राहतो, मनात जागतो तो गिरीश कार्नाड यांच्या 'तुघलक' नाटकातूनच. एका नव्या नजरेने इतिहास बघायला लावणारे हे नाटक मानवी स्वभाव आणि वर्तन, स्मृती आणि संकल्पना यांचा विविध तऱ्हेने शोध घेण्याचा प्रयत्न करते. या नाटकातील व्यक्तिरेखा दशकानुदशके आपल्या मनात राहतात, जगतात ! अरविंद देशपांडे यांनी आविष्कारतर्फे सादर केलेले हे नाटक अजूनही मराठी रंगमंचाच्या हिशेबी एक प्रभावी नाटक म्हणून कायम लक्षात राहिले. भारतीय भाषांतील या नाटकाचे अनुवाद तितकेच लोकप्रिय झाले आहेत. ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी मराठीतून या नाटकाचा अनुवाद केला आहे.